🌾 रोप लावण 🌾
रोप लावण लावण
आज आलिया भरात
रोपं कोवळी कोंबण
मऊ मऊ चिखलात
भरतार माझा बाई
चिखलान गं माखला
कड काढितो बांधाची
माझ्या पोटचा धाकुला
सासू तरव्यात माझी
गाणं गातीया सुरात
नणंद आणूनि देती
माझ्या तरवा हातात
बांध लिंपितो गं बाई
उभा वाफ्यात सासरा
हाती दिराच्या शोभतो
बैल जोडीचा कासरा.
चिखलाची गं आंबील
उभ्या अंगाला शिंपती
पावसात वाकूनीया
सख्या रोपण करती
दाटी वाटीनं लाविली
रोप मोठाले होईल
हिरवं गं शेत माझं
उद्या सोन्याचं होईल..
वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की, वाफ्यातनी तरवा टाकायचा.. तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की, सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग. वरनं एकसारखं कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल...
(👉 **संपूर्ण लेख पुढे असाच या div मध्ये कॉपी करून टाकू शकतोस.**)
– किरण सुभाष चव्हाण
🌾 रोप लावण
कोकणातील पावसाळी मेहनतीचं जिवंत चित्र
🌱 कविता
रोप लावण लावण
आज आलिया भरात
रोपं कोवळी कोंबण
मऊ मऊ चिखलात
भरतार माझा बाई
चिखलान गं माखला
कड काढितो बांधाची
माझ्या पोटचा धाकुला
सासू तरव्यात माझी
गाणं गातीया सुरात
नणंद आणूनि देती
माझ्या तरवा हातात
बांध लिंपितो गं बाई
उभा वाफ्यात सासरा
हाती दिराच्या शोभतो
बैल जोडीचा कासरा
चिखलाची गं आंबील
उभ्या अंगाला शिंपती
पावसात वाकूनीया
सख्या रोपण करती
दाटी वाटीनं लाविली
रोप मोठाले होईल
हिरवं गं शेत माझं
उद्या सोन्याचं होईल
---
🌧️ पावसाची चाहूल
वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की वाफ्यातनी तरवा टाकायचा.
तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग!
वरनं एकसारखं कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल.
---
👩🌾 बायका आणि त्यांची धावपळ
आमच्या बायकासनी भागाटल्यापासून थारा नाही.त सं रोपा सुरू झाल्या की तिच्या पायाला दम कुठला!भगाटायला कावळं करकरायला लागलं की हिंची जेवण करायची लगबग.जेवणाचं आटोपलं की म्हशींच्या धारा काढायच्या, ते सगळं आवरून डोईवर खोळं घेऊन शेताच्या वाटेला लागायचं.घरात करणारी म्हातारी कोतारी असली की या बायका आपलं सडाफटींग एक मार्गी शेताकडं…मागणं आणि शेरडा करडांची लटाबर सोबतच.शेतात पाय टाकती नं टाकती, कंबरला पावसाळी कागद घट्ट बांधून तिरवड्यावर बुड टेकून बसतात बघा तरव्यात.हिरव्यागार तरव्याचा ताटवा पुढ्यात घेऊन तिरावड्यावर बसून घाईघाईनं मग तरवा वरबडायचा…
---
🌿 हिरवाईचा शालू
सगळं कस हिरवं हिरवं…
झाडं हिरवी, झुडपं हिरवी, सगळा रान शिवार हिरवाकंच.
डोळ्यात हिरवाई दाटते. हिरवाईचा शालू जणू जमिनीला अंथरलेला.
गडद अभाळातन दाट सरीन कोसळणारा पाऊस साऱ्या सृष्टीला चिंब भिजवतो.
पांढऱ्या धुक्याची झालर अंगावर पांघरून पाठीराखा डोंगर राना शिवारावर नजर ठेवून उभा…
मधल्या व्हाळा चिवळाटातन नितळगार पाणी धुमाळीनं पळत असतं.
---
💪 एकत्र काम
रोपा लावणीचं काम म्हणजे दोघा तिघांचं काम नव्हे.
कधी कधी रोपा लावणीला पाहुण्यारावळ्यांची मदत घ्यावी लागते.
आळका बळनं असताना गल्लीतल्या माणसांना पण बोलवायला लागतं.
“माझ्यात आज तर उद्या तुझ्यात” केलं तरच तवा कुठं रोप लावून वसारतीया म्हणायचं.
म्हाताऱ्या आयाबायांच्या कडं तरवा काढायचं काम.
डोक्यावर इरलं घेऊन खालच्या तिरावड्यावर बसून बोलत चालत त्या तरवा वरबडत असतात.
रोप लावायची म्हणजे कंबर घट्ट असावी लागते म्हणून तरण्या बाया रोप लावायच्या कामाला.
शेतातली पारंपरिक गाणी त्या बायकांच्या ओठांवर नांदतात.
---
🐂 पुरुषांची कामं
पुरुष माणसं चिखल करायला, उभं अंग चिखलानं माखून, पाय गुंठ्यावर ठेवून बैल हाकत असतात.
कधी बैल, कधी पॉवर ट्रेलर…
एकजण हातात खोरं घेऊन बांधाच्या कडा काढतो, कारण बांध नीट काढला नाही तर वाफ्याला शोभा येत नाही.
“बांध नीट काढा की नाहीतर लोकं नावं ठेवतील” असं मालकीण बाई ओरडते.
---
🧺 जेवणाचा आस्वाद
दुपारच्याला उघड्या माळरानावर बसून जेवणाचा घास…
मालकीनीन करून आणल्याली उसळ बचाक बचाकभर भाकरीवर वाढते.
कांदा-भाकर, उसळ, मिरचीच्या ठेच्याचा चवरा — कोणत्याही फाईव्ह स्टार हॉटेलपेक्षा गोड!
---
☕ सायंकाळचा चहा
चार वाजता गरमागरम चहा आला की बांधावर बसून चहाचा घोट घेताना थकवा निघून जातो.
सायंकाळी मग सगळ्यांना घरी परतायची ओढ लागते.
हातातली तरव्याची मुठ संपवून शेवटचं आळं खवून बायका वाफ्यातून बाहेर पडतात आणि सांज व्हायला घरच्या वाटेला लागतात.
---
🌧️ शेवटचं चित्र
महिना घुमतोय रोप लावून करायला…
आंग शिणून जातं, बोटं चिंबून जातात.
उभा पाऊस अंगावर झेलावा लागतो.
भात खाताना काय वाटत नाही पण रोप लावताना कळतंय काय हाल व्हतात!
सकाळच्या धारा काढून शेताला पळायचं आणि संध्याकाळच्या धारलाच घरला परतायचं.
माती संग माती व्हवून, आंगभर चिखल लिंपूण आणि घामाचं शिंपण करून, काळ्या आईच्या कुशीत आज हिरवं सपान लावलं तरच उद्या सुगीला शेत सोन्यामोत्याचं होईल.
---
✍️ – किरण सुभाष चव्हाण
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा