पोस्ट्स

गांव विकताना पाहिला - किरण चव्हाण.

इमेज
                          गांव विकताना पाहिला दिवसाढवळ्या  लोकशाहीचा उदो उदो पाहिला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. बोल किती द्यायचं पाचशे हजार..दोन हजार मताला.? अहो तुम्ही द्याल तेवढं मी हायचं की तयार घ्यायला. तो बघा आताच हजार देऊन गेला तुम्ही किती देताय.? हे घे दोन हजार त्याच्यापेक्षा डब्बल. मी काय कमी वाटलो का काय..? मग उचल भंडारा,घे शपथ,म्हण माझं मत नाही बदलत. हा बघ उचलला,घेतली शपथ तुझ्या आईच्यान नाही बदलत.. दारू आमची मजा तुमची जाऊ दे गाडी सरळ धाब्यावरती. खा-प्या भरा पोटं आडवं- तिडवं पण बोट बरोबर बटणावरती. दारू मटण पैशावरती गांव ताव मारताना पाहिला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. काय होता इतिहास इथे मातीचा... मातीसाठी माणसांचा. सारं काही विसरला माणूस क्षणात पैशासाठी बदलला. आणि रात्रीचं माझा गांव मी विकताना पाहिला. स्वराज्यासाठी,मातीसाठी,राजाच्या एका शब्दासाठी जान कुर्बान करायचीत इथं माणसं. आणि आता कोण कुठला ,कुणाच्या स्वार्थासाठी आज स्वतःलाच विकायला  तयार झालीत माणसं. भंडारा उचलायचे इथे ए...

'असावे सुंदर असे माझे गांव.'-किरण चव्हाण.

इमेज
  (देवा तुझे किती सुंदर आकाश या गीताच्या चालीवर) 'असावे सुंदर असे माझे गांव.' असावे सुंदर असे माझे गाव गुण्यागोविंदाने सर्वांनी रहावं नको कुणी दुःखी असो सर्व सुखी  गोड वाचा असो सर्वांमुखी गरीब श्रीमंत नको भेदभाव सर्वांभूती असो समभाव आपणची ठेऊ गावची स्वच्छता  दिसावी सर्वांना सुंदरता गावाचा विकास मिळुनी करूया  आम्हीं प्रगतीची कास धरूया लहानांची कदर मोठ्यांचा आदर एकत्र कुटूंब तेचि सुखी घर गुणी सज्जनांचा असो अधिवास करावा उपदेश सकळ जनास अवघाची गांव एकीने नांदावं समृध्द संपन्न गांव माझे व्हावं.

भारताची जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुख- किरण चव्हाण.

इमेज
'जलतरणामध्ये सुवर्णमयी इतिहास रचणारी भारताची जलतरणपटू जलकन्या कांचनमाला पांडे- देशमुख.'                                         ती एक लाट बेधुंदपणे पाण्यावर स्वार होऊन यशाचा किनारा गाठणारी. तिचं नी पाण्याचं जिव्हाळ्याचं अतूट घट्ट नातं.तिनं आत्मविश्वासाने  झेपावं आणि कवेत घ्यावं पाण्याने तिलाही.पाण्याच्या पाठकुळीवर स्वार होऊन पादाक्रांत केलीत तिने यशाची अनेक शिखरे... रचलाय एक नवा इतिहास.साकारलाय अद्वितीय विजय.स्वतःच्या दृष्टीहीनतेवर मात करत देशाच्या जलतरणाला जागतिक स्तरावर जिने एक नवी दृष्टी दिलीय.मनातल्या स्वप्नांना सत्यात उतरवताना त्या प्रत्येक स्वप्नांना लाभलाय प्रत्येक वेळी यशाचा किनारा...प्रखर जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर तिने पार केलाय भवसिंधु...स्वप्नांच्या मागे पोहताना ती आता पोहोचलीय सातासमुद्रापार. तिला माहितीचं नाहीं कधी थांबणं. आणि तिला कोणी थांबवूही शकत नाही..तिनं गाठलाय आता आयुष्यातला सुवर्णमयीक्षण.येणाऱ्या प्रत्येक आव्हानांना झुगारून देत तिने अखेर सिद्ध केलंय...

जन्म लेकीचा- किरण चव्हाण.

इमेज
  जन्म लेकीचा... माय माझी विनवणी मी आता करू कोणापाशी, तू ही असा कसा गं घाव घालतेस माझ्या मुळाशी. सांग तुझ्याशिवाय मी  कोणाच्या गर्भात वाढायची ...? तू पण जर अशी वागत असशील तर..  मी आई कोणाला म्हणायची...? खरंच का गं तुला वाटतं..? मी जन्मालाच येऊ नये जन्मानंतर एकमेकींनी तोंड कधीच पाहू नये. बाबांनाही माझ्या काहीसं असंच वाटत का गं..? मग त्यांना तू हवी,आई हवी, बहीण हवी पण पोटची मुलगी नको का गं..? नशीबवान आहात आईबाबा तुम्ही  तुम्हाला तुमच्या आईबाबाने जन्म दिला, मीच दुर्दैवी  जन्माला येण्याअगोदर तुम्ही माझा जन्म  नाकारला. तुमच्या पोटी येण्याचा असा मी हो कोणता गुन्हा केला? गर्भातच खुडून टाकता का हो एवढी मोठी शिक्षा मला..? तुम्हांला दिवा हवा वंशाला , तर गर्भपात करून पैसा हवा कुणाला, स्वार्थ साधताय तुमचा तुम्ही पण माझ्या जीवाचा कोण घेणार हवाला..? निर्लज्ज आहेत नराधम ते त्यांना लाज जनाची ना मनाची, पण तुम्हालाही आईबाबा कस कळू नये मुलाच्या हव्यासापोटी हत्या करताय पोटच्या मुलीची. या नराध्यमांच्या नादी आई तू ही कशी लागलीस गं..? नदी नाल्यांच्या काठाने पुरताना मला तुला काहीच...

समाजभान उपक्रम - किरण चव्हाण.

इमेज
'अंधारातल्या प्रगतीला प्रकाश देण्याचा समाजभानचा छोटासा प्रयत्न.' इवल्याशा झोपडीला  कुडामेडाचं दार गं. साचलाय अंधार  कुठून येईल उजेड गं.                         दोन वेळच्या भुकेला आवर घालण्यासाठी जिथं आटापिटा करावा लागतो तिथं अंधारल्या झोपडीत कुठून येणार प्रकाशाचा किरण...कशी उजळणार ती.अंधारातल्या दोन जिवांची ही कहाणी आहे मिणचे खुर्द ता भुदरगड येथील मायलेकींची. प्रगती परीट सध्या नववीत शिकते.वडिलांचं छत्र कधीचं हरवलेलं.आई आहे तिलाही अधूनमधून फिट येते.त्यातूनही ती माय रोजच्या भुकेची तडजोड करण्यासाठी उन्हातान्हात दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरीला जाते.घरात दिवाबत्तीची सोय नाही त्यामुळे दिवसा दारातून येणारा आणि रात्रीचा दिव्याच्या मिणमिणता उजेड एवढीच उजेडाची सोबत.आज दिव्याच्या मिणमिणत्या उजेडातच प्रगतीला आपला अभ्यास उरकून घ्यावा लागतो..                       आज एक सावित्रीची लेक अंधारात आपलं जीवन घडवू पाहतेय..'ज्ञानदीप लावू जगी' असं फक्त म्हणायचं आपण. पण शेजारच्या एका ज्ञान...

अभंगवाणी - पांडुरंगा...- किरण चव्हाण.

इमेज
  'पांडुरंगा...' तूच पांडुरंगा निवारी हा काळ ।  राहिले न बळ अंगी आता  ।।  चित्त नाही चित्ती जीव जीवापाशी।  काय माझी स्थिती सांगू तुज  ।।  मुक्यापरी मन सोसतची जाय ।   किती हे सायास सहावे मी  ।।  सुखाचे कारणी दुःखाचा हा भोग ।   नाही उपभोग मज घ्यावयाचा ।।      सोसवेना आता दे गा तू आधार ।    टाकीतो मी भार तुजवरी  ।।  नको ऐसें जिणे देऊ मज देवा ।  नाही आता हेवा जीवनाचा  ।।  पुरे झाली आस नको आता वास ।  तुच माझा श्वास पांडुरंगा  ।।  काय उरे आता इथे माझेपण ।  देई मज ठाव तुजपाशी  ।।  

बलुतेदार परीट समाजाविषयी..- किरण चव्हाण.

इमेज
  'एक वेध परीट समाजाचा : भूतकाळापासून वर्तमानकाळपर्यंतचा.'                                            गावगाड्यातील बारा बलुतेदारांपैकी परीट हा एक महत्वाचा आणि प्रामाणिक असणारा मेहनती समाज.महाराष्ट्रात तो परीट तर इतर राज्यांत 'धोबी' या नावाने ओळखला जातो.२०११ च्या जनगणनेनुसार देशात परीट समाजाची लोकसंख्या ८,२२,००,००० इतकी आहे.संपूर्ण राज्यात तो कमी अधिक प्रमाणात विखुरला गेला आहे.या परीट समाजात मादीवाला,अगसार, पारित, रजक, एकली,चकली, राजाकुला,वेलूतदार,सेठी,मरेठीए अशा जाती-प्रजाती आहेत.संत गाडगेबाबांशी या समाजाचं जिव्हाळ्याचं नातं.आपल्या परंपरागत व्यवसायातून कित्येक वर्षे हा  समाज आपल्या गावच्या सेवेत रुजू आहे.अशा या परीट समाजाचा भूतकाळापासून आज वर्तमानकाळपर्यंत घेतलेला हा वेध..                                        आमच्या गावाच्या वरल्या आळीला एका कडन वसल्याली सताट घरं हाइत....