मदतीचा हात मायलेकीच्या निवाऱ्यासाठी

' मायलेकीसाठी निवारा उभा करूया संकल्पसिद्धीचे साक्षीदार होऊया.' भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक येथे श्रीमती रेखा धोंडीराम परीट व प्रगती धोंडीराम परीट या दोघी मायलेकी राहतात. गल्लीतल्या एका वळणावरच्या कोपऱ्यात विठ्ठल मंदिराच्या उजव्या बाजूला एक छोटेखानी मातीचे घर आहे.घराला कांबटाचं दार.आत जाताना वाकून जावं लागतं.हे घर म्हणजे दाटीवाटीचा खोपडाचं म्हणायचा.दोन चार लोकांना बसायलाही पुरेशी जागा नाही.. घरात पूर्ण अंधार प्रकाशाची सोय नाही.रात्रीचा दिवा लावावा म्हटलं तरी त्या दिव्यात रॉकेल कुठून आणणार..? कारण रॉकेल आणायचं तर रेशन कार्ड पाहिजे.एकंदरीत स्वतःच्या मालकी हक्काची जमीन नाही,राहतं घर ते ही नावावर नाही,मूळ कागदपत्रे नसल्याने रेशनकार्ड,आधारकार्ड (आईचे नाही) सारखी महत्वाची कागदपत्रे उपलब्ध होत नाहीत.त्यामुळे गरिबीची वास्तवता कागदोपत्री सिद्ध होत नसल्याने शासनाच्या सोयीसुविधापासून आज वंचित रहावं लागत आहे....