गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे पुस्तक - दिवाकर दुर्गे
गुलामाला गुलामीची जाणीव करून देणारे पुस्तक - दिवाकर दुर्गे मी श्री .दिवाकर दुर्गे,गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम,नक्षलग्रस्त , आदिवासीबहुल ,विकासापासून ,आधुनिक झगमगाटापासून कोसोदूर अशा भागात सहायक शिक्षक म्हणून मागील 17 वर्षापासून सेवा देत आहे . मी मागील काही दिवसापासून कायम विनाअनुदानित , विनाअनुदानित ,अंशत : अनुदानित अशा शाळांमधील शिक्षकांच्या व कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करीत होतो. विशेषकरून गडचिरोली जिल्हयातील विनाअनुदानित शिक्षकांच्या समस्या . कारण हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मी अशा पुस्तकाच्या शोधातच होतो .व योगयोगाने यू -ट्यूबवर मा. किरण चव्हाण सर यांच्या ‘विनाअनुदानितची संघर्षगाथा ’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा महाराष्ट्र राज्याच्या शिक्षणमंत्री महोदय वर्षाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत झाल्याचा व्हिडीओ बघितला व लगेच श्री.किरण चव्हाण सरांशी संपर्क साधून पुस्तकाची मागणी केली . मी ज्या शाळेत क...