पोस्ट्स

गावच्या हातकामातून तयार झालेल्या अस्सल कोल्हापुरी चप्पला आता ऑनलाइन ऑर्डर करा! टिकाऊ, आकर्षक आणि परंपरेचा साज – आत्ताच ऑर्डर करा WhatsApp वर.

इमेज
🌟 अस्सल कोल्हापुरी चप्पल • संकेश्वरी चप्पल • माठाची चप्पल • कापशी चप्पल – गावच्या हातकामाचा परंपरागत साज, आता ऑनलाइन उपलब्ध! 🌟 ✨👞 पायात घाला परंपरेचा साज 👞✨ अहो मंडळी ही कोल्हापुरी चप्पल म्हणजे काय साधी चप्पल नाय हा मंडळी! ह्या चपलेत गावचं मातीचं ऊन, कारागिराच्या हाताचं जिव्हाळं आणि टिकाऊपणाचं सोनं भरलेलं आहे. पायात घातली की जणू पायाखालून मातीशी आपुलकी जुळलीय असं वाटतं. जितकी जुनी तितकी उठून दिसते , आणि बघता बघता तुमच्या पायात परंपरेचा मानाचा साज येतो. गावाकडच्या हातकामाला तोड नाही… एकदा घातली की पुन्हा पुन्हा घालाविशी वाटते! 🌾 कापशी माठाची चप्पल – गावच्या हातकामाचा साज अहो मंडळी, कापशी (ता. कागल) हे गाव म्हणजे चप्पल बनवायचं माहेरघर! इथली माठाची चप्पल अगदी हातकामाचा साज घेऊन तयार होते. कणखर कातडी, मऊसूत शिवण आणि जपलेला परंपरागत डिझाइन – अशी ही चप्पल पायात घातली की पायाला लागते गावरान शान आणि टिकाऊपणा. नमुना 1 नमुना 2 ...
इमेज
  ✨👞 पायात घाला परंपरेचा साज 👞✨ अस्सल कोल्हापुरी, संकेश्वरी, कापशी आणि भुईवाद माठाच्या चप्पल – टिकाऊपणा, स्टाईल आणि आराम यांचा अद्भुत संगम! 🖤 कोल्हापुरी चप्पल अरे ही कोल्हापुरी चप्पल म्हणजे फक्त चप्पल नाय रे भाऊ, ही तर गावच्या मातीचं औतं घेतलेली कला आहे. कारागिरांच्या हातातलं जादूच जणू – घट्ट शिवलेली, पायाला अगदी फिट बसणारी. **जितकी जुनी होत जाते तितकी जास्त भारी दिसते** – पायाला घट्ट पकडते, आणि कुठंही चाललास तरी पायाखालून मातीची ऊब जाणवते. अस्सल गावाकडचा साज, आणि आयुष्यभर टिकणारी! 🤎 संकेश्वरी चप्पल ✅ हलक्या वजनात मऊसूत ✅ दिवसभर आराम ✅ अनोखी रचना 💛 कापशी चप्पल ✅ शुद्ध लेदर ✅ आकर्षक रंगसंगती ✅ परंपरेचा वारसा 🧡 भुईवाद माठाचे चप्पल ✅ नाविन्यपूर्ण डिझाईन ✅ पारंपरिक स्पर्श ✅ टिकाऊपणाची खात्री 🌟...
इमेज
🌾 रोप लावण 🌾 रोप लावण लावण आज आलिया भरात रोपं कोवळी कोंबण मऊ मऊ चिखलात भरतार माझा बाई चिखलान गं माखला कड काढितो बांधाची माझ्या पोटचा धाकुला सासू तरव्यात माझी गाणं गातीया सुरात नणंद आणूनि देती माझ्या तरवा हातात बांध लिंपितो गं बाई उभा वाफ्यात सासरा हाती दिराच्या शोभतो बैल जोडीचा कासरा. चिखलाची गं आंबील उभ्या अंगाला शिंपती पावसात वाकूनीया सख्या रोपण करती दाटी वाटीनं लाविली रोप मोठाले होईल हिरवं गं शेत माझं उद्या सोन्याचं होईल.. वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की, वाफ्यातनी तरवा टाकायचा.. तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की, सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग. वरनं एकसारखं कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल... (👉 **संपूर्ण लेख पुढे असाच या div मध्ये कॉपी करून टाकू शकतोस.**) – किरण सुभाष चव्हाण   🌾 रोप लावण कोकणातील पावसाळी मेहनतीचं जिवंत चित्र 🌱 कविता रोप लावण लावण आज ...

सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का..

🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? – स्त्री स्वातंत्र्याचा विचार 🌸

इमेज
🌸 सावित्रीच्या लेकी स्वतंत्र आहेत का? 🌸   सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहेत का..?             महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज,समाजसुधारणेसाठी  शिक्षणाची धारणा जनमाणसात रुजवणारे महात्मा फुले, स्त्री शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, समाजात न्याय,समता प्रस्थापित करणारे शाहू महाराज, दीन दलितांचे कैवारी आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रथमतः या विभूतींना वंदन करते तसेच या व्यासपीठावरील ज्ञानवंत,प्रज्ञावंत मान्यवर, सुज्ञ परिक्षक आणि हे विचारमोती टिपण्यासाठी बसलेले श्रोतेजन आपणा सर्वांना नमस्कार करून  आपल्यासमोर विषय मांडते आहे...सावित्रीच्या लेकी आज स्वतंत्र आहे का..?             सुरुवातीलाच मी सांगू इच्छिते की, परवाची एक घटना आहे मनीषा पाटील नावाची शूर नारी भारतीय सैन्यात बी.एस.एफ मध्ये कार्यरत आहे. परवा आपल्या दहा महिन्याच्या बाळाला घरी ठेऊन देशाच्या सीमेवर रक्षण करण्यासाठी गेली..?  म्हणजे आजची स्त्री देशाच्या रक्षणाची जबाबदारी आपल्या स्वतःच्या खांद्यावर घेत ...

बालग्राम परिवाराच्या भेटीने जुन्या आठवणींना मिळाला उजाळा...

इमेज
  बालग्राम परिवाराच्या भेटीने जुन्या आठवणींना मिळाला उजाळा...            कित्येक वर्षाने आज बालग्राम परिवाराला भेटता आले. इतक्या वर्षाने पाहताना ते जुने दिवस मनात जसेच्या तसे उभारत होते...सगळं कसं बदलत गेलं पण बालग्राम आहे तसं आहे...आठवणीतला जुना ठेवा जपून ठेवावा तसं मायेची ऊब देत बालग्राम अजूनही तिथेच आहे. डी.एड झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात बालग्राम पन्हाळा येथे सहा महिने काम केले.छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पावनगडावर वास्तव्य करायला भेटणं हा माझ्या आयुष्यातील एक भाग्याचा आणि आनंदाचा काळ होता. बालग्रामसारख्या चिमुकल्या मुलांना मायेचा आधार देऊन माय बापासारखे प्रेम देऊन जपणाऱ्या संस्थेत काम करण्याची संधी मिळाली. मला वाटत माझ्या सामाजिकतेच्या जडणघडणीला इथूनचं सुरुवात झाली...बालग्रामधील ते जुने क्षण ती मायाळू लेकरं आमचा तो एक परिवार होता...किती छान होते ते दिवस..बालग्रामधील त्या आठवणींचा तो सोनेरी काळ माझ्या जीवनातील हळव्या क्षणांच्या आठवणींचं माहेरघरचं झालं होतं जणू...बालग्रामधील आल्हाददायक पहाट असो अथवा...

कविता संग्रह

 अनुक्रमणिका १. मायबापा २.गुरू ३. माझा गुरू ४. संस्कारांचा परिसरस्पर्श ५. ओव्या ६. पांडुरंग ७. भार ८. हरी मुखे म्हणा ९. ऋण तयांचे १०. बालग्राम प्रार्थना ११.  इंद्रजीत १२. शाळा १३. शिक्षका तू वेडा कुंभार  १४. माय मराठी १५. कविता १६. बाप १७. असावे असे माझे गांव. १८.  'सजा-ए -मौत' १९. . गांव विकताना पाहिला २०. . भ्रष्टाचार. २१. कामगार. २२. 'अजून अशा किती निर्भया..?' २३. ऑनर किलिंग. न्याय मिळालाच पाहिजे. २४. भूक २५.  learn or not to learn .. २६. आम्ही सारे भारतीय  २७. माझा शेतकरी बाप २८. .पीक २९. . धरित्रीचा बाळ. ३०. .  पान्हा आटला. ३१.  माझ्या कोकणी माहेरा... ३२. . तिचं अस्तित्व.. ३३. .  हुंडाबळी... ३४. जन्म लेकीचा ३५. पोरी ३६. आईची आई ३७. माई ३८. नारी ३९. स्कार्फ ४०. तू ४१. तिन्हींसांजेचे सुख ४२. तुझ्या डोळ्यांतील निज ४३. माझे हरवलेपण ४४. रुसवा ४५. मी ४६. माणूस म्हणून ४७. अश्रू ४८. बाजार फार झाला ४९. बासरी ५०. भूक ५१. स्वप्नही.. ५२. स्वप्नांचा चुराडा ५३. बाळ...माफ कर ५४. मी ५५. जगणं स्वतःसाठी ५६. करार ५७. मोरपीस ५८. हो विश्वात्मक ५९. वरद ६०. ती...