🌿 रोप लावणीची गोष्ट – कोवळ्या रोपांपासून हिरव्या सोन्यापर्यंतचा प्रवास | लेखन : किरण सुभाष चव्हाण

🌱 आपल्या रोप लावणीची सुरुवात 🌱 🌱 रोप लावण 🌱 रोप लावण लावण | आज आलिया भरात रोपं कोवळी कोंबण | मऊ मऊ चिखलात || लेकीवाणी रोप माझी | दिसतीया गं साजिरी || तान्ह्या हिरव्या अंगाची | माझी लाजिरी गोजिरी || भरतार माझा बाई | चिखलान गं माखला कड काढितो बांधाची | माझ्या पोटचा धाकुला || सासू तरव्यात माझी | गाणं गातीया सुरात नणंद आणूनि देती | माझ्या तरवा हातात || बांध लिंपितो गं बाई | उभा वाफ्यात सासरा हाती दिराच्या शोभतो | बैल जोडीचा कासरा || चिखलाची गं आंबील | उभ्या अंगाला शिंपती पावसात वाकूनीया | सख्या रोपण करीती || दाटी वाटीनं लाविली | रोप मोठाले होईल हिरवं गं शेत माझं | उद्या सोन्याचं होईल || वयल्या अंगानं पावसानं एकसारखी धार सुरू केली की, वाफ्यातनी तरवा टाकायचा.. तरवा चांगला हिरवादाट इतभर फुटून आला की, सुरू झाली बघा रोपा लावणीची लगबग. वरनं एकसारखा कोसळणारा धो धो पाऊस आणि सगळ्या शिवारात रोप लावणीची धांदल. आमच्या बायकासनी तरी भागाटल्यापासून...