वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अविनाश लोंढे यांची अनोखी साहित्यिक भेट
‘@75’ कवितासंग्रहाचे प्रकाशन
विशेष म्हणजे आपल्या वडिलांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त अविनाश लोंढे यांनी ७५ कवितांचा हा कवितासंग्रह आपल्या वडिलांना समर्पित करून एक अनोखी साहित्यिक भेट दिली.
विशेष म्हणजे हा कविता प्रकाशनाचा सोहळा घरातील सदस्यांच्या उपस्थितीत, परिसरातील साहित्यिकांना आमंत्रित करून अत्यंत आपुलकीच्या वातावरणात औपचारिक पद्धतीने घरामध्येच आयोजित करण्यात आला होता. वडिलांच्या वाढदिवसानिमित्त साहित्याच्या माध्यमातून दिलेली ही अनोखी भेट उपस्थित सर्वांच्या मनाला भावली.
प्रारंभी उपस्थित सर्व साहित्यिकांचे स् स्वागत व प्रास्ताविकातून सौ. विद्या खामकर मॅडम यांनी कवी अविनाश लोंढे यांच्या वडिलांना दीर्घायुष्य मिळावे व अशीच १०० कवितांच्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाची संधी मिळावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या
अविनाश लोंढे यांनी ‘@75’ या कवितासंग्रहामागील भूमिका व उद्देश स्पष्ट केला. त्यांचे वडील ईश्वर लोंढे यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त हा ७५ कवितांचा संग्रह त्यांनी त्यांना समर्पित केला आहे.
वडिलांच्या जीवनातील संघर्ष, चढ-उतार, अनुभव तसेच सामाजिक आणि परिसरातील विविध विषयांना कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध करण्यात आले आहे.
यानंतर सदर कार्यक्रमात डॉ.संभाजी जगताप, संजय खोचारे,ईश्वर लोंढे व उपस्थित साहित्यिकांच्या शुभहस्ते ‘@75’ कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.
मनोगत व्यक्त करताना डॉक्टर संभाजी जगताप यांनी पुस्तकाचे कौतुक करत भुदरगड तालुक्यातून नवनवीन साहित्यिक निर्माण होत असून त्यांच्या लेखणीतून दर्जेदार साहित्याची निर्मिती होत असल्याचे सांगितले.
अशा साहित्यिकांना प्रोत्साहन देणे, त्यांचे साहित्य वाचणे आणि त्यांना प्रेरणा देणे आवश्यक असल्याचे त्यांनी व्यक्त केले.
संजय खोचारे यांनी आपल्या ग्रामीण शैलीतील भाषणातून अविनाश लोंढे यांच्या कवितासंग्रहाचे कौतुक केले. ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनाचा संदर्भ देत आपल्या परिसरातील साहित्यिकांनी लेखणीच्या बळावर मोठी उंची गाठली आहे.
किरण चव्हाण यांनी आपल्या मनोगतातून ‘@75’ कवितासंग्रहाला शुभेच्छा देत ईश्वर लोंढे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
यानंतर सचिन दुधाळे यांनी सुरेश भट यांच्यासारख्या गजलगारांचा संदर्भ देत आपल्या खुमासदार शैलीत मनोगत व्यक्त केले.
तानाजी पावले यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, निसर्ग आणि सामाजिक वास्तवावर भाष्य करत या वेदना साहित्यामधून मांडल्या गेल्या पाहिजेत, असे मत व्यक्त केले.
यानंतर अविनाश लोंढे यांनी आपल्या ‘@75’ कवितासंग्रहातील काही निवडक कवितांचे वाचन केले. त्यांच्या हृदयस्पर्शी कवितांना उपस्थित साहित्यिक व रसिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यानंतर चारोळीकार सौ. विद्या खामकर मॅडम यांनी सुद्धा प्रेम आणि वेदना या विषयांवरील त्यांच्या निवडक चारोळ्यांचे सादरीकरण केले.
शब्दांच्या माध्यमातून अविनाश लोंढे यांनी आपल्या वडिलांचे जीवन, संघर्ष आणि भावना जिवंत केल्या. या प्रसंगी ईश्वर लोंढे यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले आणि अभिमानाने त्यांचा उर भरून आला.
सदर कार्यक्रमास डॉ.संभाजी जगताप ,संजय खोचारे, तानाजी पावले गुरुजी,विद्या खामकर,अशोक गुरव, बाळासो जाधव,किरण चव्हाण, सचिन दुधाळे,सुशांत बोटे,सौ पवार सर्व साहित्यिक, रसिक प्रेमी, लोंढे परिवारातील सदस्य उपस्थित होते
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामकृष्ण मगदूम यांनी केले. विविध साहित्यिक व कवितांचे दाखले देत त्यांनी कार्यक्रमाला रंगत आणली. साहित्यिकांनी एकत्र येऊन साहित्याचा उत्सव साजरा केला पाहिजे, असा विचार त्यांनी मांडला. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
साहित्यिक, रसिक आणि मान्यवरांच्या उपस्थितीत ‘@75’ कवितासंग्रहाचा प्रकाशन सोहळा भावपूर्ण आणि उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
पुस्तक प्रकाशनातील क्षणचित्रे
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा..!
कवी अविनाश लोंढे यांच्या ‘@75’ कवितासंग्रहासाठी हार्दिक अभिनंदन व मनःपूर्वक शुभेच्छा. आपल्या पुढील लेखन वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. साहित्य क्षेत्रात आपल्या लेखणीचा सुगंध असाच दरवळत राहो, हीच सदिच्छा.
,
खरंतर या पुस्तक प्रकाशनाच्या सोहळ्याला उपस्थित रहायची खूप इच्छा होती.पण मला काही कारणास्तव येता आले नाही.
उत्तर द्याहटवातरीही आपण सर्व मान्यवरांनी @ 75 या पुस्तक प्रकाशनाचा सोहळा कौटुंबिक पध्दतीने आणि आनंदमय वातावरणात पार पाडलात त्याबद्दल सर्व मान्यवर साहित्यिक व उपस्थित इतर मान्यवर मंडळींचे मन:पूर्वक आभार....
Thank you so much....🙏🙏
अभिनंदन
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाअविनाश गरीब कुटुंबातील व्यक्तीमत्व अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्टप्रद शिक्षण घेत नोकरी न करता एक योग शिक्षक आणि साहित्यिक म्हणून तुझ्याकडे पाहिलं की अभिमानाने उर भरून येतो. मितभाषी आणि मनमिळावू अविनाश तुझ्या कार्याला मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा आणि तुझ्या वडिलांना दीर्घायुष्य लाभो हीच प्रार्थना.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाखूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाखुप खुप अभिनंदन अविनाश सरांचं. एक अतिशय साधाच पण अतिशय संपन्न असा हा आगळा वेगळाच घरगुती कार्यक्रमाच्या सुंदर क्षणाचा मलाही एक साक्षीदार होता आलं त्याबद्दल आभार. सर्वांचे अनुभव ऐकायला मिळाले याचंही खरंच समाधान वाटलं. भावी वाटचालीस आमच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा.... ❤️❤️❤️❤️❤️
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवाएका सुंदर आणि हृदयस्पर्शी कार्यक्रमाला उपस्थित राहता आलं.. साहित्यक्षेत्रात अविनाश यानी अजून उंच भरारी घ्यावी. यासाठी खूप खुप शुभेच्छा
उत्तर द्याहटवाधन्यवाद 🙏
हटवा